
कोलाड परिसरातील बेकायदा भंगारचे अड्डे बंद करण्यासंदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व महासंचालन कडे तक्रार दाखल कोलाड पोलिसांच्या आशीर्वादामुळे बेकायदा भंगारचे अड्डे राजरोसपणे सुरू भंगार व्यवसायिकांकडून कोलाड पोलिसांना लाखोंचा हप्ता? कोलाड : निलेश महाडीक कोलाड परिसरात बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांना उधाण आलेले असून या परिसरात पोलीसांच्या आशिर्वादाने बेकायदा भंगाराचे अड्डे दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसून येत असून येथील पोलीसांना भंगाराचे डोहाळे लागलेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. कोलाड परिसर, भिरा फाटा, पुगाव, पुई, महाबळेपाळा स्टॉप समोर, राऊत बाग नर्सरी समोर ,येथे बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून हा अवैध व्यवसाय कोलाड पोलीसांच्या आशिर्वादाने सुरू असून लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन कोलाड पोलीसांनी ह्या बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांवर वरदहस्त ठेवल्याचे बोलले जात आहे. गेली वर्षानुवर्षे येथे अवैध भंगाराचे अड्डे सुरू असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. या परिसरात बेकायदा भंगा...