किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
अलिबाग (जिमाका) खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.21 ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामांचा विचार करता शेतकरी नोंदणी पूर्ण झाली नसल्याचे दिसून आल्याने पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता, दि.10 नोव्हेंबर, 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी याची नोंद घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा 7/12, चालू बँक खाते व स्पष्ट दिसणारे आधारकार्ड यासह आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता खरेदी केंद्रावर स्वत: येवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व जिल्हा पणन अधिकारी केशव ताटे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment