रायगड : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरात आयर मोहल्ला येथे बेकायदा क्लब - जुगाराचा व्यवसाय तेजीत असून येथील पोलीसांना दरमहा हफ्ता सुरू असल्यामुळे त्यांनी ह्या अवैध क्लब-जुगाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे. येथे बेकायदा क्लब-जुगार राजरोसपणे सुरु असून अनेक तरुण या क्लब-जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
या अवैध धंद्यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली असून अनेक तरूण व वयोवृद्ध या क्लब -पत्ते -जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे क्लब- पत्ते -जुगार माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील जुगाराचा धंदा कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी व या अवैध क्लब- पत्ते जुगाराला साथ देणाऱ्या पोलीसांवरच कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. तरी या जुगार व्यवसायिकांवर कडक कारवाई करून या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment