सुधागड ता. परळी परिसरात बेकायदा पेट्रोलची सर्रासपणे विक्री

सुधागड (आशिष शेळके) 

सध्या परळी परिसरात चार ते पाच ठिकाणी   पेट्रोल बाटलीत भरून वाहन चालकांना बेकायदेशीर मार्गाने विक्री केली जात असून तसेच एकादी जिवीतहानी झाली तर कोणाला जबादार तुम्ही धरणार व तसेच बेकायदेशीर पेट्रोल विक्रीवर बंदी असताना या प्रकाराकडे दुर्लक्ष कोण करते. पेट्रोल विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाकडून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

या चोराटी पेट्रोल विक्री करणाऱ्यांकडून नागरिकांच्या जिवाला व तसेच अजू बाजूला असणाऱ्याया वस्तीला धोका पोहचू शकतो. या मंडळींनी कशाचेही भान न ठेवता आपला पेट्रोल विक्रीचा धंदा बेकायदेशीरपणे सुरू ठेवला असून या ठिकाणी जाऊन पोलीसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.

Comments

Popular posts from this blog