चणेरा व तांबडी परिसरात बेकायदा पेट्रोलची सर्रासपणे विक्री

रायगड : प्रतिनिधी

 सध्या चणेरा परिसरात चार ते पाच ठिकाणी व तसेच तांबडी चेक नाक्यावरच्या पोलीस चौकीच्या बाजूला एका घरातून पेट्रोल बाटलीत भरून वाहन चालकांना बेकायदेशीर मार्गाने विक्री केली जात असून तसेच एकादी जिवीतहानी झाली तर कोणाला जबादार तुम्ही धरणार व तसेच बेकायदेशीर पेट्रोल विक्रीवर बंदी असताना या प्रकाराकडे दुर्लक्ष कोण करते. पेट्रोल विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाकडून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

या चोराटी पेट्रोल विक्री करणाऱ्यांकडून नागरिकांच्या जिवाला व तसेच अजू बाजूला असणाऱ्याया वस्तीला धोका पोहचू शकतो. या मंडळींनी कशाचेही भान न ठेवता आपला पेट्रोल विक्रीचा धंदा बेकायदेशीरपणे सुरू ठेवला असून या ठिकाणी जाऊन पोलीसांनी त्यांच्यावर कडककारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.

Comments

Popular posts from this blog