रोहा तालुक्यामध्ये युवकांचे संघटन भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून करणार
रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेशजी ठाकुर यांचे कोलाड विभागात युवकांशी संवाद साधताना केले वक्तव्य
रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुका हा तीन मतदार संघात विभागला आहे. पेण विधानसभा, अलिबाग विधानसभा, श्रीवर्धन विधानसभा असा विभागला आहे. तीन ही मतदार संघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढविण्यासाठी युवकांचे संघटन हे भाजपा जिल्हा अध्यक्ष व पनवेल चे आमदार प्रशांतदादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पेणचे आमदार रवीशेठ पाटील, श्रीवर्धनचे मा. आमदार अवधूत दादा तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये, युवामोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग, तालुका मंडळ अध्यक्ष सोपान जांभेकर व सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून रोहा तालुक्यामध्ये युवकांचे संघटन करणार असे महेशदादा ठाकुर यांनी कोलाड विभागात युवकांशी संवाद साधताना म्हटले आहे.
भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यापासून महेशदादा ठाकुर हे रोहा तालुक्यातील विविध गावातील युवकांशी गाठीभेटी घेत आहेत.
Comments
Post a Comment