ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत बालसई (कुरेशी नगर) येथे भगतगिरी बुवाबाजी करणाऱ्यांचा धंदा तेजीत! भाई नावाच्या भगतांची टोळी अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची करतेय लुटमार! कोलाड (प्रतिनिधी) :- जुन्या रूढी परंपरा मोडीत काढत आपण नव्या युगात पदार्पण केलेले आहे. परंतु आजची स्थिती पाहता आपला समाज आज देखील अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात गुरफटत चालल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्थितीत अंधश्रद्धेचे अनेक प्रकार आपल्या सभोवताली घडताना दिसत असतात. देवाचा कोप, भूत, गुप्तधन, चमत्कार, मंत्र, अवतार, पूर्वजन्म-पुनर्जन्म, अपशकुन, नरबळी, करणी यांसारखे अंधश्रद्धेचे प्रकार अनेक ठिकाणी पाहण्यात आलेले आहेत. या अंधश्रद्धेमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. तरी अंधश्रद्धेचा चष्मा फेकून प्रत्येकाने सत्य परिस्थितीला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे! अंधश्रद्धेचा असाच एक प्रकार ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बालसई येथील कुरेशी नगर दिसून आलेला आहे. येथे भगतगिरी-बुवाबाजीचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची सं...
Posts
Showing posts from November, 2022
- Get link
- X
- Other Apps
ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची अपर जिल्हाधिकारी अमोल यादव अलिबाग (जिमाका):- आपल्या जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी नुकतेच घारापूरी-एलिफंटा येथे केले. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून दि.19 ते दि.25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नुकतेच एलिफंटा लेणी (जागतिक वारसा स्थळ), घारापुरी येथे या सप्ताहाच्या उद्घाटनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, मुंबई सर्कल डॉ.राजेंद्र यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता राणे-कोठारे, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, एलिफं...
- Get link
- X
- Other Apps
इंदापूर येथे बेकायदा जुगार क्लबची दहशत! जुगारामुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर बेकायदा जुगार क्लबला आशिर्वाद कुणाचा? रायगड (प्रतिनिधी) : माणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदापूर येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीस प्रशासनाने हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. सध्या माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या सुग्रास हॉटेल रेस्टॉरंट अँड बारच्या बाजूला सलून आहे, सलून आणि रेस्टॉरंट बार च्या पाठीमागे एका बंद घरामध्ये हा जुगार क्लब चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. ...
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन येथे बोर्ली शहरांमध्ये बेकायदा मटका जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांचे दुर्लक्ष! रायगड (निलेश महाडीक) :- दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार तेजीत सुरू असून पोलीसांना हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील अवैध धंद्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटका जुगारामुळे व अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. बोर्ली शहर परिसरात, दिवेआगार, वडवली , येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा मटका जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
- Get link
- X
- Other Apps
नागोठणे येथे बेकायदा मटका जुगार आणि ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांचे दुर्लक्ष! रायगड (निलेश महाडीक) :- नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार आणि ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरू असून पोलीसांना हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील अवैध धंद्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटका जुगारामुळे व ऑनलाईन चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. नागोठणे शहरात एसटी स्टँडच्या बाजूला, विशाल मेडिकल स्टोअर्सच्या बाजूला आणि वाकण फाटा येथे बेकायदा मटका जुगार सुरू असून नागोठणे-कोळीवाडा येखील मिनीडोअर स्टँडच्या बाजूला ऑनलाईन चक्री जुगार राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा मटका जुगार आणि चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
- Get link
- X
- Other Apps
कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जराकीवली यांचा भाजपा युवा मोर्चा रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध रोहा : प्रतिनिधी कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे व हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय हे हिंदू विरोधी वक्तव्य केले आहे यातच भर घालत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत असेही अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहे अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्याच्या निषेध करत निषेधार्थ आज रोहा तहसील कार्यालय ला भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका यांच्या वतीने निषेधाचे पत्र दिले व कारवाई ची मागणी केली. यावेळी रोहा तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर, कृष्णा बामणे, संजयजी लोटनकर, सनील इंगावले, नरेश कोकरे, अविनाश काणेकर, निलेश धुमाळ उपस्थित होते
- Get link
- X
- Other Apps
गुटखा खाण्याच्या सवयीमुळे रोह्यातील काळा उंदीर झाला बेचैन! जिथे खाणार तिथेच घाण करणार, अशी उंदराची घाणेरडी वृत्ती!! अनेक टपरीवाल्यांनी उधारी देणे केले बंद, कोलाडमधील टपरीतून गुटख्याचे पाकीट चोरले!! बायकोचे दागिने ठेवले गहाण, गाडीचे हप्ते थकवले? फायनान्स कंपनीचे एजंट मारतात बोंब कोलाड (प्रतिनिधी) :- रोह्यातील काळ्या उंदराच्या करामती सध्या सगळीगडे वाऱ्यासारख्या पसरू लागल्या असून दिवसभर दारू पिणे आणि गुटखा खाण्याच्य सवयीमुळे त्याचा चेहरा आदिमानवासारखा दिसू लागला आहे. हजारो वर्षांपूर्वी आदिमानव असाच दिसायचा यामध्ये शंकाच नाही! या काळ्या उंदराने तर आता कहरच केल्याचे दिसत आहे. कोलाडमध्ये एका पान टपरीवरून तर याने एक गुटख्याचा पाकीट चोरून तेथून पळ काढला, त्यामुळे हा काळा उंदीर किती चोरटा आहे ते स्पष्ट होत चालले आहे. या हरामखोराने रोहामध्ये मच्छी विकणाऱ्या एका गरीब महिलेला ३५०/- रूपयांना फसविले असून तिला ३ महिने तोंड पण दाखविले नाही. तसेच रोहा बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये ४६०/-/रूपये उधारी ठेऊन त्यांना ६ महिने तोंड दाखविलेले नाही. त्यामुळे याने स्वतःची लायकी घालवून घेतल्याचे ...
- Get link
- X
- Other Apps
चणेरा आणि तांबडी परिसरात बेकायदा पेट्रोलची विक्री तेजीत, कारवाईची मागणी रोहा (प्रतिनिधी) :- सध्या चणेरा परिसरात चार ते पाच ठिकाणी व तसेच तांबडी चेक नाक्यावरच्या पोलीस चौकीच्या बाजूला एका घरातून पेट्रोल बाटलीत भरून वाहन चालकांना बेकायदेशीर मार्गाने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पेट्रोल हे अत्यंत ज्वलनशील ज्वलनशील असल्यामुळे त्याची बेकायदेशीर मार्गाने वाहतूक करून विक्री होत असल्यामुळे एखादी भयानक दुर्घटना होऊन जिवीतहानी झाली होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बेकायदेशीर पेट्रोल विक्रीवर बंदी असताना देखील सर्रासपणे हा प्रकार येथे घडताना दिसून येत असल्यामुळे याकडे शासनाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारे पेट्रोलची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाकडून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. या चोराटी पेट्रोल विक्री करणाऱ्यांकडून नागरिकांच्या जिवाला व तसेच अजू बाजूला असणाऱ्याया लोकवस्तीला धोका पोहचू शकतो. या मंडळींनी कशाचेही भान न ठेवता आपला पेट्रोल विक्रीचा धंदा बेकायदेशीरपणे सुरू ठेवला असून या ठिकाणी जाऊन पोल...
- Get link
- X
- Other Apps
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे “सायकल रॅली”व “वॉकेथॉन” संपन्न नवमतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे केले आवाहन अलिबाग (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने “विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2023” अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या पुढाकारातून अलिबाग येथे “सायकल रॅली”आणि “वॉकेथॉन”चे आयोजन करण्यात आले. या रॅलीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री साळवी, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नवमतदारांना मतदार नोंदणी करण्याविषयीचे आवाहन करण्यात आले. छायाचित्रासह मतदारयादी विशेष संक्षिप्त ...
- Get link
- X
- Other Apps
दक्षता जनजागृती अभियानांतर्गत “भ्रष्टाचार मुक्त भारत, विकसित भारत” विषयाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी केले मार्गदर्शन अलिबाग (जिमाका):- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या वतीने स्पर्धा विश्व अकॅडमी, रायगड-अलिबाग येथे विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना “दक्षता जनजागृती” अभियानांतर्गत भ्रष्टाचार व कुठल्याही प्रकारची लाच यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उप अधीक्षक सुषमा सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कुठल्याही प्रकारे लाच देणे व लाच घेणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. कुठलाही सरकारी दाखला आपण लाचेशिवाय मिळविणे, हा आपला अधिकार आहे. शासकीय योजना प्रत्येकासाठी असतात मग त्या योजनेच्या लाभ...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर अलिबाग (जिमाका):- राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने आज जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022 चा तपशील पुढीलप्रमाणे:-ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल कर...
- Get link
- X
- Other Apps
कोलाडचे प्रभारी पोलीस अधिकारी सुनिल साबळे हे बेकायदा भंगाराच्या धंद्यावर मेहेरबान? पोलीस महासंचालकांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी कोलाड (निलेश महाडीक) :- कोलाड परिसरात बेकायदा भंगाराचे अड्डे जोमाने सुरू असून येथील प्रभारी पोलीस अधिकारी सुनिल साबळे हे भंगाराचे धंद्ये करणाऱ्यांवर मेहेरहान का? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोलाड परिसर, भिरा फाटा, पुगाव, पुई, महाबळेपाळा येथे बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून हा अवैध व्यवसाय कोलाड पोलीसांच्या आशिर्वादाने सुरू असून लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन कोलाड पोलीसांनी ह्या बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांवर वरदहस्त ठेवल्याचे बोलले जात आहे. गेली वर्षानुवर्षे येथे अवैध भंगाराचे अड्डे सुरू असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. परिणामी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रीत करून येथील बेकायदा भंगाराचे अड्डे तातडीने बंद करावेत व या अवैध व्यवसायाला अभय देणाऱ्या येथील स्थानिक पोलीसांवरच प्रथम कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आ...
- Get link
- X
- Other Apps
तळा येथील बेकायदा मटका - जुगार राजरोसपणे चालू तळा येथील मटका कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी मटका व्यावसायिकांकडून पोलिसांना 5 लाखांचा हप्ता? पोलीस निरीक्षक श्री गोविंद ओमासे यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ फक्त गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन रायगड : निलेश महाडीक तळा शहरात बेकायदा मटका-जुगाराचा व्यवसाय तेजीत असून येथील पोलीसांना दरमहा हफ्ता सुरू असल्यामुळे त्यांनी ह्या अवैध मटका-जुगाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे. येथे बेकायदा मटका-जुगार राजरोसपणे सुरु असून अनेक तरुण या मटका-जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचा मटका फोनवर व हिंडता-फिरता घेणे देखील सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी आकडे लावण्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात आहेत. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घा...
- Get link
- X
- Other Apps
“ग्रंथोत्सव” पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न तरुणांसाठी होणार विशेष सत्रांचे आयोजन अलिबाग (जिमाका) जिल्ह्यात दि.14 व दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी डोंगरे वाचनालय सभागृह येथे होणाऱ्या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी सुप्रसिद्ध लेखक-साहित्यिक रविंद्र तांबोळी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुजाता पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्या तथा साहित्यिका श्रुती देसाई, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी श्री.संतोष शेडगे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षीच्या ग्रंथोत्सवात आबालवृद्धांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण सत्र आयोजित करावेत, तरुण वर्गासाठी विशेष सत्रांचे आयोजन करावे, या ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांच्या विषयांबाबत नागरिकांकडूनही...
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन अलिबाग (जिमाका) भारताचे माजी उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे दि.31 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्रधानाचार्य श्री.के.वाय. इंगळे, श्री.गणेश अडोडे, श्री.संजय माने, श्री.सतीश जमदाडे, श्री.अरविंद सिंह यादव, श्रीमती सीमा देव, केदार केंद्रेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रधानाचार्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील प्रेरणादायक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यालयाची विद्यार्थिनी सांची माने हि...
- Get link
- X
- Other Apps
निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे जिल्हा कोषागार अधिकारी रमेश इंगळे अलिबाग (जिमाका) शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2022 रोजी हयात असल्याबाबतचे “हयात प्रमाणपत्र” (Life Certificate) दि.1 ते दि.30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रमेश इंगळे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकाचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. ही घोषणापत्रे संबंधित बँकांकडे पाठविण्यात आलेली आहेत. पुनर्नियुक्त/ पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन / निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दक्षता जागरुकता सप्ताह साजरा अलिबाग (जिमाका) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तहसील कार्यालयाच्या वतीने दि.31 ऑक्टोबर 2022 ते दि.6 नोव्हेंबर 2022 सहाण आदिवासीवाडी येथे दक्षता जागरुकता सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नायब तहसिलदार (संजय गांधी योजना) मानसी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित स्त्री व पुरुष लाभार्थ्यांना शासनाकडील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे श्रीमती म्हात्रे व श्रीमती पुरो यांनी अर्ज वाटप केले. या योजनांचा जास्त...
- Get link
- X
- Other Apps
"112 आपत्कालीन नंबर" व "रायगड कंट्रोल रूम" वरून आलेल्या आदेशाला कोलाड पोलीसांनी मारले फाट्यावर बेकायदा भंगारचे अड्डे तात्पुरते बंद ठेवून पुन्हा सुरू केले भंगार व्यावसायिकांकडून पोलीसांना लाखोंचा हप्ता? भंगार किंग बोलतात की, आम्ही पोलीसांना "× टा" वर मारतो, आम्ही पोलीसांना हप्ते देतो म्हणून आमच्यावर कारवाई करण्याची त्यांची हिंमत होत नाही! कोलाड : निलेश महाडिक कोलाड परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावांच्या हद्दीत भंगाराच्या व्यवसायाचे अवैध धंदे राजरोसपणे चालू असलेल्या व्यवसायाला पोलिसांचे संरक्षण आहे असे दिसून येत आहे. अशा अवैध धंद्यांमुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्याऐवजी वाढेल यात शंका नाही! अशा अवैध भंगार व्यावसायिकांकडून हप्ता घेऊन त्यांना संरक्षण देत असून त्यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अशा अवैध धंद्यांविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे चालू असून येथील पोलीस जीवंत आहेत की मेले? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. येथील बोकायदा भंगाराचे अड्डे कोलाडच्या...