तळा येथील बेकायदा मटका - जुगार राजरोसपणे चालू
तळा येथील मटका कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी
मटका व्यावसायिकांकडून पोलिसांना 5 लाखांचा हप्ता?
पोलीस निरीक्षक श्री गोविंद ओमासे यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ फक्त गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन
रायगड : निलेश महाडीक
तळा शहरात बेकायदा मटका-जुगाराचा व्यवसाय तेजीत असून येथील पोलीसांना दरमहा हफ्ता सुरू असल्यामुळे त्यांनी ह्या अवैध मटका-जुगाराला अभय दिल्याचे बोलले जात आहे. येथे बेकायदा मटका-जुगार राजरोसपणे सुरु असून अनेक तरुण या मटका-जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
या अवैध धंद्यामुळे येथील कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचा मटका फोनवर व हिंडता-फिरता घेणे देखील सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी आकडे लावण्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात आहेत. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील मटका जुगाराचा धंदा कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी व या अवैध मटका-जुगाराला साथ देणाऱ्या पोलीसांवरच कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. तरी या मटका व्यवसायिकांवर कडक कारवाई करून या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment