"112 आपत्कालीन नंबर" व "रायगड कंट्रोल रूम" वरून आलेल्या आदेशाला कोलाड पोलीसांनी मारले फाट्यावर

बेकायदा भंगारचे अड्डे तात्पुरते बंद ठेवून पुन्हा सुरू केले

भंगार व्यावसायिकांकडून पोलीसांना लाखोंचा हप्ता? 

भंगार किंग बोलतात की, आम्ही पोलीसांना "× टा" वर मारतो, आम्ही पोलीसांना हप्ते देतो म्हणून आमच्यावर कारवाई करण्याची त्यांची हिंमत होत नाही!

कोलाड : निलेश महाडिक

कोलाड परिसरातील पंचक्रोशीतील विविध गावांच्या हद्दीत भंगाराच्या व्यवसायाचे अवैध धंदे राजरोसपणे चालू असलेल्या व्यवसायाला पोलिसांचे संरक्षण आहे असे दिसून येत आहे. अशा अवैध धंद्यांमुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्याऐवजी वाढेल यात शंका नाही! अशा अवैध भंगार व्यावसायिकांकडून हप्ता घेऊन त्यांना संरक्षण देत असून त्यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अशा अवैध धंद्यांविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे चालू असून येथील पोलीस जीवंत आहेत की मेले? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. येथील बोकायदा भंगाराचे अड्डे कोलाडच्या पोलीसांना दिसत नसल्यामुळे त्यांची दृष्टी कमजोर झाली आहे का? परिणामी  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी येथील पोलीसांची नेत्र तज्ञांमार्फत डोळे तपासणी करण्याचे गरजेचे बनवून राहिलेले आहे.

या परिसरात वर्षानुवर्षे अवैध भंगाराचे अड्डे सुरू असून या अशा धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. येथील भंगार व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आपली दहशत ही निर्माण केली आहे परिणामी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अशा अनुचित व अवैध धंद्याला मूठमाती देणे ही काळाची गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. तरी अशा बेकायदा धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog