कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जराकीवली यांचा भाजपा युवा मोर्चा रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध
रोहा : प्रतिनिधी
कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे व हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय हे हिंदू विरोधी वक्तव्य केले आहे यातच भर घालत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या धर्मवीर उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत धर्मवीर उपाधीसाठी मराठी लायक नाहीत असेही अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहे अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्याच्या निषेध करत निषेधार्थ आज रोहा तहसील कार्यालय ला भाजपा युवा मोर्चा रोहा तालुका यांच्या वतीने निषेधाचे पत्र दिले व कारवाई ची मागणी केली.
यावेळी रोहा तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर, कृष्णा बामणे, संजयजी लोटनकर, सनील इंगावले, नरेश कोकरे, अविनाश काणेकर, निलेश धुमाळ उपस्थित होते
Comments
Post a Comment