नागोठणे येथे बेकायदा मटका जुगार आणि ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांचे दुर्लक्ष!

रायगड (निलेश महाडीक) :- नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा मटका जुगार आणि ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरू असून पोलीसांना हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील अवैध धंद्यांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटका जुगारामुळे व ऑनलाईन चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

नागोठणे शहरात एसटी स्टँडच्या बाजूला, विशाल मेडिकल स्टोअर्सच्या बाजूला आणि वाकण फाटा येथे बेकायदा मटका जुगार सुरू असून नागोठणे-कोळीवाडा येखील मिनीडोअर स्टँडच्या बाजूला ऑनलाईन चक्री जुगार राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा मटका जुगार आणि चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog