इंदापूर येथे बेकायदा जुगार क्लबची दहशत!
जुगारामुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर
बेकायदा जुगार क्लबला आशिर्वाद कुणाचा?
रायगड (प्रतिनिधी) : माणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदापूर येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीस प्रशासनाने हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.
सध्या माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या सुग्रास हॉटेल रेस्टॉरंट अँड बारच्या बाजूला सलून आहे, सलून आणि रेस्टॉरंट बार च्या पाठीमागे एका बंद घरामध्ये हा जुगार क्लब चालू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. सदरचा बेकायदा धंदा या परिसरात राजरोसपणे सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.
Comments
Post a Comment