जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दक्षता जागरुकता सप्ताह साजरा
अलिबाग (जिमाका) जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तहसील कार्यालयाच्या वतीने दि.31 ऑक्टोबर 2022 ते दि.6 नोव्हेंबर 2022 सहाण आदिवासीवाडी येथे दक्षता जागरुकता सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नायब तहसिलदार (संजय गांधी योजना) मानसी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमांतर्गत उपस्थित स्त्री व पुरुष लाभार्थ्यांना शासनाकडील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे श्रीमती म्हात्रे व श्रीमती पुरो यांनी अर्ज वाटप केले.
या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment