चणेरा आणि तांबडी परिसरात बेकायदा पेट्रोलची विक्री तेजीत, कारवाईची मागणी
रोहा (प्रतिनिधी) :- सध्या चणेरा परिसरात चार ते पाच ठिकाणी व तसेच तांबडी चेक नाक्यावरच्या पोलीस चौकीच्या बाजूला एका घरातून पेट्रोल बाटलीत भरून वाहन चालकांना बेकायदेशीर मार्गाने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
पेट्रोल हे अत्यंत ज्वलनशील ज्वलनशील असल्यामुळे त्याची बेकायदेशीर मार्गाने वाहतूक करून विक्री होत असल्यामुळे एखादी भयानक दुर्घटना होऊन जिवीतहानी झाली होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बेकायदेशीर पेट्रोल विक्रीवर बंदी असताना देखील सर्रासपणे हा प्रकार येथे घडताना दिसून येत असल्यामुळे याकडे शासनाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारे पेट्रोलची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाकडून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
या चोराटी पेट्रोल विक्री करणाऱ्यांकडून नागरिकांच्या जिवाला व तसेच अजू बाजूला असणाऱ्याया लोकवस्तीला धोका पोहचू शकतो. या मंडळींनी कशाचेही भान न ठेवता आपला पेट्रोल विक्रीचा धंदा बेकायदेशीरपणे सुरू ठेवला असून या ठिकाणी जाऊन पोलीसांनी त्यांच्यावर कडककारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment