राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन


     अलिबाग  (जिमाका) भारताचे माजी उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे दि.31 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्रधानाचार्य श्री.के.वाय. इंगळे, श्री.गणेश अडोडे, श्री.संजय माने, श्री.सतीश जमदाडे, श्री.अरविंद सिंह यादव, श्रीमती सीमा देव, केदार केंद्रेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रधानाचार्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील प्रेरणादायक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यालयाची विद्यार्थिनी सांची माने हिने सरदार वल्लभभाई पटेल यांचे चरित्र विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले.

     त्यानंतर विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त प्रभात फेरीचे तसेच स्वच्छता विषयक PLOG RUN या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सीमा जोशी, स्नेहल पवार, सेहला चांदनी, अर्जुन गायकवाड, अण्णासाहेब पाटील, नम्रता काकडे, सुनील बिरादार, बंकट गवई, संदीप निकम, मुकेश सुमन, विष्णु दत्त, करन चौहान आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog