कोलाडचे प्रभारी पोलीस अधिकारी सुनिल साबळे हे बेकायदा भंगाराच्या धंद्यावर मेहेरबान?
पोलीस महासंचालकांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी
कोलाड (निलेश महाडीक) :- कोलाड परिसरात बेकायदा भंगाराचे अड्डे जोमाने सुरू असून येथील प्रभारी पोलीस अधिकारी सुनिल साबळे हे भंगाराचे धंद्ये करणाऱ्यांवर मेहेरहान का? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोलाड परिसर, भिरा फाटा, पुगाव, पुई, महाबळेपाळा येथे बेकायदा भंगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून हा अवैध व्यवसाय कोलाड पोलीसांच्या आशिर्वादाने सुरू असून लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन कोलाड पोलीसांनी ह्या बेकायदा भंगाराच्या अड्ड्यांवर वरदहस्त ठेवल्याचे बोलले जात आहे. गेली वर्षानुवर्षे येथे अवैध भंगाराचे अड्डे सुरू असून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे.
परिणामी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रीत करून येथील बेकायदा भंगाराचे अड्डे तातडीने बंद करावेत व या अवैध व्यवसायाला अभय देणाऱ्या येथील स्थानिक पोलीसांवरच प्रथम कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment