
अवैध धंद्यांना पाठबळ देणे गोरेगाव पोलीसांना महागात पडणार! लोणेरे येथील बेकायदा जुगार क्लब विरोधात उच्चस्तरिय चौकशीचे आदेश आता पोलीसांचीच चौकशी होणार रायगड (प्रतिनिधी) :- समाजामाध्ये कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलीसांची भूमिका आणि कर्तव्य हे महत्वपूर्ण असते. पण जर पोलीसच कायदा पायदळी तुडवून अवैध धंद्यांना त्रास देत असतील तर...??? हा तर कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार आहे! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्र पोलीसांनी "एक कार्यक्षम पोलीस दल" म्हणून लौकीक मिळविलेला आहे, परंतु "हप्तेखोर" पोलीसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर आलेली आहे. अशाच प्रकारे हप्ते घेऊन अवैध धंद्यांना साथ देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीसांविरूद्धच तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणेरे येथे बेकायदा जुगार क्लब जोमाने सुरू असून गोरेगाव पोलीसांनी लाखो रूपयांचा हप्ता घेऊन हा जुगार क्लब सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. लोणेरे येथे मोरेश्वर कार शोरूमच्य...