महाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावें येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शिबिरामध्ये जवळपास 150 ते 200 महिलांच्या आरोग्याची तपासणी

अलिबाग (जिमाका) :- महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रायगड अंतर्गत तसेच नवतेजस्विनी  महाराष्ट्र राज्य ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत  सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्र महाड येथील रावढळ या गावात दि.5 डिसेंबर 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावें यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

       या शिबिरामध्ये जवळपास 150 ते 200 महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांमध्ये वाढते अनेमियाचे प्रमाण रक्तातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे आरोग्याची होणारी हानी यापासून प्रत्येक महिलेने सुरक्षित रहावे, वेळोवेळी आरोग्याची तपासणी करावी, आपल्या स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी आपला आहार कसा असावा याची जाणीव करून देण्यासाठी तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ज्या महिलांची थाळी पोषक द्रव्ये व कर्बोदके यांनी परिपूर्ण असेल त्या  पहिल्या तिघींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  याचा उद्देश काय तर महिलांनी आपल्या आहाराबाबाबत जागरूक होऊन सुदृढ पिढी तयार करणे, जेणेकरून भारतीय पिढी ही सुदृढ होईल, सुदृढ महिला सुदृढ देश घडावा व ॲनीमियाचे गांभीर्य लक्षात घ्यावे.       

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावें येथील आरोग्य अधिकारी डॉ.विनायक डावरे, समीना पवार, श्रीमती पारधी,  सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्र महाडच्या संपूर्ण  कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा समन्वयक श्रीमती वर्षा पाटील यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog