महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे भव्य दिव्य क्रिकेट मनसे चषक स्पर्धा संपन्न

मुंबई : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील भांडुप येथे दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. श्री. राजन दादा गावडे यांच्यातर्फे व क्लासिक बॉईज मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य दिव्य मनसे चषक स्पर्धांचे आयोजन केले होते. ही स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट सामने भांडुप मधील काटेरी मैदानात अतिशय उत्साहात पार पडली.

या स्पर्धेमध्ये भांडुप मधील टीम अखिलेश ९ व टीम अँटिक ९ या दोन टीमने फायनल मध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही टीमच्या सामन्यांमध्ये अखिलेश ९ या टीमने मनसे चषक स्पर्धा जिंकून विजयी ठरला तर उपविजेची टीम ही अँटिक ९ ही ठरली.

या सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभामध्ये भांडुप मधील मनसेचे विभाग प्रमुख श्री. संदीप भाई जलगावकर, भांडुप शाखाप्रमुख श्री. दिलीप दादा गुरव, महाराष्ट्र सैनिक श्री. स्वप्निल भाऊ तावडे, आदिवासी प्रतिष्ठानचे सोशल मीडिया अध्यक्ष राकेश हुले व अनेक महाराष्ट्र सैनिक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थित आमचे क्रिकेट मंडळातर्फे आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog