रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील रेशनकार्ड गैरव्यवहार प्रकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना निवेदन देवून केली कारवाई ची मागणी
रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील रेशनकार्ड गैरव्यवहार प्रकरणी आज भाजपा जिल्हाध्यक्ष पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या कडे योग्य ती कारवाई होण्यासाठी निवेदन दिले आहे.
देवकान्हे गावात हिंदू कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये मुस्लिम व्यक्तींची नावे लागली आहेत. 35 ते 40 हिंदू कुटुंबातील रेशनकार्ड वर लागली आहेत विशेष करून देवकान्हे गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना ह्या नों. दी झाल्या कशा कोणतं रॅकेट तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे. त्याप्रकरणी सखोल चौकशी करावी व यामध्ये जे दोषी असतील मग ते रास्त भाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकारी जे कोणी दोषी असतील याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टी रोहा च्या वतीने निवेदन आज भाजपा जिल्हाध्यक्ष पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना रोहा मंडळ अध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांनी आज निवेदन दिले.
Comments
Post a Comment