माणगांव मधील शुभांगी सोनवणे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित!

रायगड (प्रतिनिधी) : या वर्षीचा महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय सन्मान सोहळा पुरस्कार हा दि.४ डिसेंबर २०२२ रोजी रविंद्र नाट्य मंदिर दादर मुंबई येथे सकाळी ११.०० वा क्राईम प्रिव्हेंशन अँटी करप्शन कमिटी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना तसेच पोलीस मित्र  माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्त्यां तसेच भाविका बहुउदेशिय सामाजिक संस्थेच्या संस्थापीका शुभांगी रमेश सोनवणे यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक तसेच प्रशासकीय सेवेतिल उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी डॉ.अफसर कुरेशी अध्यक्ष आय.एच.आर.ए.ओ. एंड क्राइम प्रवेशन अँन्टी करप्शन कमेटी,कांचन अवस्थी फिल्म अभिनेञी तसेच भारत भूषण,कर्मान राजानी हास्य कलाकार,शबीना सय्यद समाज सेविका तसेच क्लासवन पोलीस अधिकारी यांना देखील यावेळी महाराष्ट्र रत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. यावे या कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक माई जयश्री सावारडेकर समाजसेविका, जितेद्र सकपाळ समाजसेवक, डॉ. श्रूतिका कडू,अझिज शेख, डॉ. यतिन देवधर,सलाम खिचडी यांनी केले होते.      

माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यात्या शुभांगी सोनवणे यांना हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक क्लासवन अधिकारी यावेळी  उपस्थित होते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते. शुभांगी सोनावणे यानी मागील कित्येक वर्षात सामाजिक कामकरत असताना कोरोना काळात अतिशय सुरेख अशी त्यांनी कामगिरी बजावली होती यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने रायगड जिल्ह्याचे माणगाव तालुक्याचे नाव रोशन झाले असून रायगड जिल्हात माणगांव तालुक्यात मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या या कामाची दखल घेत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून तसेच त्यांच्या मित्र मंडळी मधून  मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव  होताना दिसत आहे. 

Comments

Popular posts from this blog