रोहा तालुक्यातील रेशनिंगचा गैरकारभार उघडकीस आनणार भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर यांचा इशारा.

रोहा : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील रेशनिंगचा भ्रष्टाचार, व गैरकारभार उघडकीस आणणार असा इशारा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर यांनी दिला आहे.

रोहा तालुक्यातील नागरिक अगोदरच रेशनिंग पुरवठा व वितरण व्यवस्था यांच्यामुळे हैराण झाले आहेत.

रेशनिंग वितरण करणारे दुकानदार नागरिकांची किती फसवणूक करतायत अशा घटना रोहा मध्ये खूप घडतायत परंतु जे नागरिक गावात राहत नाही परंतु रेशनींग मध्ये त्या कुटुंबाशी जोडले गेले आहेत. आणी त्यांच्या नावावर अधिकारी वर्ग आणी वितरण करणारे दुकानदार मजा मारतायत  आणी अशांचा भांडाफोड रोहा तालुक्यातील सर्व पत्रकार विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी यांची पत्रकार परिषद घेऊन तालुका अध्यक्ष महेश ठाकुर करणार आहेत. त्यामुळे वितरक दुकानदार व अधिकारी वर्ग यांचे धाबे दणाणलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog