लोणेरे येथे बेकायदा जुगार क्लब विरूद्ध थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल 

गोरेगाव पोलीस स्टोशनच्या हद्दीत बेकायदा मटका आणि जुगार क्लब तेजीत

रायगड (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणेरे येथे मोरेश्वर कार शोरूमच्या समोर रस्त्याच्या पलिकडील बिल्डींगमध्ये बेकायदा जुगार क्लब सुरू असून स्थानिक पोलीसांच्या सहकार्याने हा अवैध धंदा सुरू असल्याचे उघडकीस आलेले आहे. या अवैध धंद्यांना स्थानिक पोलीसांचा आशिर्वाद असल्याने याप्रकरणी थेट महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे या परिसरात बेकायदा मटका जुगाराचे धंदे देखील वाढलेले आहेत. पोलीसांनी लाखो रूपये हप्ता घेऊन अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. त्यामुळे येथील अवैध धंदे तातडीने बंद करण्याबाबत आणि अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog