प्रा. अमलपूरे सूर्यकांत विश्वनाथ यांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान
कोलाड : निलेश महाडीक
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
प्रा. अमलपुरे सूर्यकांत यांनी अतिशय मेहनत करून कमी कालावधी मध्ये हे यश संपादन केले आहे. त्यांना त्यांच्या पीएच. डी. साठी मार्गदर्शक म्हणुन डॉ. अनुपमा दिलीप धनावडे (माजी हिंदी विभागाध्यक्ष, डॉ. पतंगराव कदम आर्ट्स, कॉमर्स कॉलेज पेण )हे लाभले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली "मोहन राकेश के साहित्य का मनोविश्लेषणात्मक अध्ययन" या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. बाह्य परीक्षक म्हणुन डाॅ. सुनिल कुलकर्णी ( बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) डॉ. करुणाशंकर उपाध्याय (हिंदी विभाग, मुंबई विद्यापीठ ) डाॅ. अनिल सिंह (मानव्य विद्या शाखा प्रमुख मुंबई विद्यापीठ, प्रभारी प्राचार्य सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय शाहपुर ) आदिंचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. आमलपुरे सूर्यकांत यांनी अधिक परिश्रम करून अनेक उच्च पदव्या संपादन केले आसून एम. ए, एम .फिल , एम. एड, नेट , पीएच .डी . आदि.
प्रा. आमलपुरे सरांनी हिंदी साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमानात लेखन कार्य केले असून ५० शोध निबंध, ०३ पुस्तके २५कविता प्रकाशित झाले आहेत . मुंबई विद्यापिठातून माईनर रिसर्च साठी २८०००/- फेलोशिप ही दिली गेली.
महाविद्यालयीन स्तरावर १२ वर्षापासून अनेक विभागात कार्यरत आहेत. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग गेली 12 वर्षा पासुन सांभाळतात अविष्कार रिसर्च विभाग, प्रसिद्धि प्रमुख म्हणून महाविद्यालयातील विविध वृतांत, बातमी लेखनाचे काम करतात.
तसेच ४९ व्या युवक महोत्सवाचे आयोजन ही केले होते, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सत्रात अनेक शोध निबंधांचे वाचन केले होते. हिंदी विभागा सोबतच कला विभाग तसेच काही काळ उपप्राचार्य पद ही सांभाळले होते. काव्य वाचन, लेखन ते नेहमी करतात. अतिथि व्याख्यान, विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदि करतात. विद्यापीठ स्तरावर त्यांचे कार्य विशेष आहे. भरारी पथक म्हणुन, पेपर तपासनिस, पेपर सेटर म्हणुन काम केले आहेत .
त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे ट्रस्टी मा. श्री. संदीपजी तटकरे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे सर व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच कोलाड पंचक्रोशीतील सर्व प्राध्यापक मंडळी आणी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment