ग्रामपंचायत पाटणूस मध्ये शहीद वीर यशवंत राव घाडगे जयंती साजरी
रायगड : निलेश महाडीक :- माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायत मध्ये 9 जानेवारी 2023 रोजी वीर यशवंत घाडगे जयंती साजरी करण्यात आली.10 जुलै 1944 साली दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांबरोबर युद्ध करीत असताना एका जर्मन सैनिकाची गोळी लागून ते शहीद झाले. त्यावेळी त्यांनी जर्मन सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. अनेक जर्मन सैनिकांचा त्यांनी खात्मा केला. यशवंतरावांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांच्या पश्चात लष्करातील अतुच्य अशा बहुमनांचे प्रतीक म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस राजधानी दिल्ली येथे लाल किल्यासमोर दरबार भरवून भरताचे तात्कालीन व्हाईस रॉय व गव्हर्नर जनरल फिल्ड मार्शल लॉर्ड वेव्हेलं यांच्या हस्ते 3 मार्च 1945 रोजी शूर यशवंत रावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना अर्पण करण्यात आले. कै. वीर यशवंतराव यांच्या स्मृती जिवंत रहावी म्हणून माणगाव तालुक्यात दर वर्षी 9 जानेवारीला उत्सव साजरा केला जातो. 9 जानेवारी 2023 रोजी जयंती साजरी करण्यासाठी पाटणूस ग्रामपंचायत कार्यालयात वीर यशवंत राव घाडगे. यांच्या स्वर्गीय पत्नी लक्षमी बाई यशवंतराव घाडगे यांच्या माहेरचे कुटुंबीय, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, मेजर प्रताप बांदल ग्रामपंच्यायत कर्मचारी, आरोग्य सेविका जोती जाधव व ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.यशवंतराव घाडगे यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत करून त्यांच्या कुटुंबातील एक प्रतिनिधी श्री दिपक चव्हाण यांच्या हस्ते यशवंत रावांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे यांनी वीर यशवंत राव घाडगे यांची शौर्य गाथा कथन केली.
Comments
Post a Comment