वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांचे “देशाचे भविष्य तुमच्या हाती” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन

 अलिबाग : प्रतिनिधी :- नेहरू युवा केंद्र,रुरल अँड यंग फाउंडेशन आणि जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात शुक्रवार, दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता भाग्यलक्ष्मी हॉल, रिलायन्स पेट्रोल पंपजवळ, अलिबाग येथे अवघ्या 24 व्या वर्षी देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांचे युवकांना प्रेरित करणारे “देशाचे भविष्य तुमच्या हाती” या विषयावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

       हा कार्यक्रम वेळेत सुरू होईल. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका वितरणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी  7030500175 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हॉलच्या क्षमतेनुसार कार्यक्रमासाठी 500 व्यक्तींनाच प्रवेश देण्याची व्यवस्था आहे, याची सर्व युवकांनी आणि श्रोत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog