डॉ. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना विश्व हिंदी गौरव सम्मान प्रदान
रायगड : सचिन सागळे
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रष्ट संचलीत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. आमलपुरे सूर्यकांत यांना या वर्षिचा 'विश्व हिंदी गौरव सम्मान' भावना कला आणि साहित्य फाऊंडेशन दिल्ली येथून संस्थेचे अध्यक्ष भावना शर्माजी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतिने पाठविण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र व मेडल चा समावेश आहे.
डॉ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली १२ वर्षापासून महावीद्यालयात अध्यापन कार्य करतात. तसेच हिंदी भिषा व साहित्यामध्ये लेखन ही करतात. ३० कविता, ०३ पुस्तकें, ०२ कहानी प्रकाशित व ५० शोधनिबंध ही प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर ५० चर्चा सत्रात शोधनिबंध वाचन ही केले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रष्टी मा. श्री. संदीपजी तटकरे आणि सर्व पदाधिकारी तसेच महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, पंच क्रोशितील सर्व प्राध्यापक मित्र मंडळीनी अभिनंदन करुन पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment