आर. डी. सी. सी. बँक पाली शाखेच्या वतीने महिला मेळावा संपन्न.

रायगड : आशिष शेळके

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा पाली यांच्या माध्यमातून कुंभारशेत येथे नाबार्ड अंतर्गत व्हिलेज लेवल प्रोग्राम ( VIPS) S. H. G. गटाकरिता ग्रामीण भागातील महिला बचत गटासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आर. डी. सी. सी बँक पाली शाखेचे मॅनेजर श्री. डी. के. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की महिलांसाठी प्रधानमंत्री विमा सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, बँकेची होम सेव्हींग, बचत गट संकल्पना, बचत गटाची यशोगाथा तसेच विविध कर्ज योजना बँकेच्या विविध ठेव योजना बँकेत Q. R. Code व google pay ची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे त्याला. या सर्व योजनेचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणात घेऊन आपला आर्थिक विकास साधावा याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच या मेळाव्याला पाली तालुक्याचे  निरीक्षक श्री.एन.एन.नागे, सुधीर साखरले, प्रशांत जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.यानंतर पाली शाखेच्या ऍनिमेटर ऋतुजा दर्गे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी महिला मेळाव्याचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी - कुंकू हा छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला व सर्व उपस्थित महिला मंडळासाठी चहा पाण्याची व्यवस्था केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. डी. सी. सी बँक पाली शाखेचे सर्व पदाधिकारी व कुंभारशेत येथील सर्व महिला मंडळ व बचत गटातील सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित राहून सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog