डाॅ. आमलपुरे सुर्यकांत विश्वनाथ यांना नूतन उमंग साहित्य संरक्षक सम्मान प्रदान
रायगड : आशिष शेळके
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयतील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. आमलपूरे सूर्यकांत विश्वनाथ यांना ऋषि वैदिक साहित्य पुस्तकालय आगरा येथुन दिनांक 1/1 /2023 रोजी नूतन उमंग साहित्य संरक्षक सम्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदाना बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असुन या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र, ५०० रुपए रोख, मेडल चा समावेश आहे. डाॅ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली 12 वर्षा पासुन महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करतात .अध्यापना बरोबरच हिंदी भाषा व साहित्य लेखनही करतात. २० कविता,०३ पुस्तके, ५० शोध निबंध, २ कहानी प्रसिद्ध झाले असुन राष्ट्रीय - अंतराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्रात शोध निबंधांचे वाचन ही केले आहे. ऋषि वैदिक साहित्य पुस्तकालय फतेहाबाद आगरा उत्तर प्रदेश येथील अध्यक्ष मुकेश कुमार यांच्या हास्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रस्टी मा. श्री. संदीपजी तटकरे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, पंचक्रोशितील सर्व प्राध्यापक मित्र मंडळीनी अभिनंदन करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment