डॉ. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना नूतन वर्ष २०२३ साहित्य सम्मान प्रदान

रायगड : आशिष शेळके

कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. आमलपुरे सूर्यकांत यांना 'नूतन वर्ष २०२३साहित्य सम्मान' हा पुरस्कार दिनांक १ जानेवारी २०२३रोजी अंतर्राष्ट्रीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाल दधानी व संयोजक इंदु आचार्य यांच्या तर्फे ऑनलाइन पठविण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदाना बददल हा पुरस्कार प्रदान करन्यात आला असुन या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र ,मेडल चा समावेश आहे. डाॅ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली 12 वर्षा पासुन महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करतात. अध्यापना बरोबरच हिंदी भाषा व साहित्य लेखनही करतात. २० कविता, ०३ पुस्तके, ५० शोध निबंध, ०२ कहानी प्रसिद्ध झाले असुन राष्ट्रीय -अंतराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्रात ५० शोध - निबंधांचे वाचन ही केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रस्टी मा. श्री. संदीपजी तटकरे आणि सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, पंचक्रोशितील सर्व प्राध्यापक मित्र मंडलीनी अभिनंदन करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog