सरसगडावर प्रस्तरारोहनासाठी मॅकमोहन हुले व सहकार्यांनी नवीन मार्ग तयार केला

सुधागड  : राकेश हुले

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथे मॅकमोहन हुले प्रस्तारोहकाने आपल्या सहकाऱ्यांसह सरसगड किल्यावर नवीन प्रस्तरारोहन मार्ग तयार केला असून या नवीन वर्षात सहासी प्रस्तारारोहकांना या मार्गातून कमी वेळेत चढाई करता येणार आहे. व तो सहज पार करतील असा मार्ग खुला करण्यात आला आहे. सरावासाठी सुद्धा हा मार्ग उपयोगी पडणार आहे. म्हणून या भागातील प्रस्तरारोहणासाठी येणाऱ्या प्रस्तरारोहक सुखावले आहेत.

सरसगडावर पहिला मार्ग 1991 सरसगडावर तयार करण्यात आला होता. आणि 2019 मध्ये याच मार्गावर नवीन बोल्टिंग करण्यात आली होती. मागील वर्षी हुले यांनी येथे बाजूला नवीन मार्ग तयार केला असून याला स्पोर्ट्स क्लायबिंग रूट असे म्हणतात. त्याच्या बाजूला हा दुसरा नवा पारंपारिक मार्ग तयार करण्यात आला आहे. दुसरा नवीन मार्ग तयार करण्याच्या या प्रस्तारारोहन मोहिमेत प्रस्तरारोहक मॅकमोन हुले तसेच सागर मेस्त्री व विशाल सांगवी सहभागी होते. सरसगडाच्या उजव्या बाजूला 25 डिसेंबर 2022 रोजी नवीन पारंपारिक मार्गाने याची सुरुवात केली. या तात्पुरत्या गिअर्सच्या वापर होतो पिटॉन्स, चॉक्स, हेक्सा, फ्रेंड्स किल्ल्यावरील उजव्या बाजूची पाण्याची टाकी लगत असलेली भेग ॲरेक्ट फॉर्मेशन, मध्ये 2 चॉक  नट्सचा सुरक्षेसाठी वापर करून या मार्गावरून साधारण वीस फूट चढता येते येथे पहिल्या रिंग बेल्टवर सुरक्षा घेऊन 40ft वर सुरक्षित पहिले स्टेशन तयार केले असून पुढील मार्ग ट्रेव्हर्स असल्याने वरच्या बाजूस   पिटॉन मारून साधारण 15 फुटाचा मार्ग या आठवड्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.

याचा फायदा जिल्ह्यातील अनेक तरुण मुले गिर्यारोहण व प्रस्तारारोहन अगदी सहज करू शकतील यासाठी दाते व संस्थांनी पुढाकार घेऊन हे कार्य करणे गरजेचे आहे. मॅकमोहन हुले प्रस्तारारोहन व मॅक विला  जंगल यार्डचे  संस्थापक फोटो ओळ, पाली, सरसगडावर प्रस्तारारोहन मार्ग बनविताना अनेक फोटोही काढले आहेत त्यांच्या या कार्याला पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog