एफ. आय. आर. दाखल होऊन देखील गुंडगिरी करणाऱ्या हल्लेखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यास टाळाटाळ,
रोहा पोलीसांविरूद्ध थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल
रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यात रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गुंंडांनी धुमाकूळ घातलेला असून दारू पिऊन गुंडगिरी करणे, हल्ला करणे, ठार मारण्याची धमकी देणे असे कृत्य त्यांनी सुरू ठेवलेले आहेत. एफ.आर.आय. दाखल होऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने येथे पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. याप्रकरणी थेट महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून ड्युटीवर कामचुकारपणा करणाऱ्या येथील पोलीसांवरच कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
बातमी लिहिती येत नाही, विशेष म्हणजे हातात कागद आणि पेन दिल्यानंतर चार ओळी पण लिहिता येत नाही, तसेच सर्वसामान्यांना त्रास देणे, दमदाटी करणे, खंडणी मागणे यांसारख्या प्रकारांमुळे त्याच्या विरूद्ध पोलीस ठाणे, फॉरेस्ट डिपार्टमेंट येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यामुळे संपादकांनी रोहा तालुक्यातील निवी येथील समीर रामा बामुगडे याची न्यूज चॅनलमधून मधून हाकलपट्टी केली.
हाकलपट्टी केल्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. दरम्यान, त्याने निवी येथील काशिनाथ बामुगडे नावाच्या गुंडाला दारू पाजून सोबत आणले आणि संपादकांवर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर संपादक यांनी याप्रकरणी रोहा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यानंतर पोलीसांनी निवी येथील समीर बामुगडे आणि त्याचा साथीदार काशिनाथ बामुगडे या दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. परंतु गुन्हा दाखल होऊन देखील त्यावर कोणतीही प्रतिबंधक कारवाई न करण्यात आल्याने याप्रकरणी उच्चस्तरिय चौकशी करून गुन्हेगारांना साथ देणाऱ्या पोलीसांवरच कारवाई करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे
Comments
Post a Comment