सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

रायगड : आशिष शेळके

रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील घोडपापड आदिवासी वाडी रा. जि. प. शाळा येथे आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामध्ये वही, बॉलपेन, सोबत पाट्या व चप्पलांचाही समावेश होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन शंकर सागळे यांच्यातर्फे वाटप करण्यात आले.

यावेळी रा. जि. प. शाळा घोडपापड शाळेच्या मुख्याध्यापिका शेवंता ताई राठोड, श्री. फुंदे सर अंगणवाडी शिक्षिका लताताई खंडागळे, आदिवासी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष भावेश बेलोसे, विलास पवार, दीपेश लहाने, राजू शेडगे, महेश अधिकारी, दिनेश जाधव, सचिन शिर्के, शेखर चव्हाण, तसेच आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शेडगे, उपाध्यक्ष रमेश वाघमारे, सचिव महादू चव्हाण, शंकर सागळे, देवराम जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog