जिल्हा स्तरीय इंद्रधनुष्य आंतरमहाविद्यालयीन सांघीक नृत्य स्पर्धेत डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालय द्वितीय. रायगड : आशिष शेळके महाड येथील हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने आयोजित केलेल्या 'इंद्रधनुष्य' जिल्हा स्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांघीक नृत्य स्पर्धेत रोहे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. वकुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संघाने प्रा. लशत्रुघ्न लोहकरे यांच्या संघ नेतृत्वाने सांघीक नृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या या यशस्वी संघात पायल भोईर, अनिश सावंत, सागर राणे, ऋचिता शेलार, लाभेश गडेकर हर्षाली कदम, सानिका सुर्वे व स्वराज चोरगे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या जिल्हास्तरीय संघीक नृत्य स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील एकुण १८ संघांनी सहभाग घेतला होता या १८ संघातील अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून या महाविद्यालयाच्या संघाने हा द्वितीय क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाने विजयी झालेल्या स...
Posts
Showing posts from February, 2023