डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर
रायगड : आशिष शेळके :- रोहे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एक्सेल इंडस्ट्री लिमिटेड धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन शिबीर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके, एक्सेल इंडस्ट्रीचे सुरक्षा अधिकारी पुरषोत्तम पवार, कमळाकर कदम, व्ही. आर. टी. आय, रोहा संस्थेचे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीचे सी.एस.आर प्रमुख सुशिल रुळेकर, व्ही. आर. टी. आय, रोहा संस्थेचे अकाऊंटंट प्रसाद भोईर प्रा. तुळशिदास मोकल, प्रा.शत्रुघ्न लोहकरे, प्रा. सुकुमार पाटील, डॉ. अनिल शिंदे, प्रा. सीमा भोसले, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. सम्राट जाधव, प्रा. अनंत थोरात, प्रा. शिल्पा खाडे व प्रा. वैशाली कानावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात सर्वप्रथम एक्सेल इंडस्ट्रीचे सुरक्षा अधिकारी कमळाकर कदम यांनी उपस्थितांना आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या प्रकारची असते व जर आपत्ती निर्माण झाली तर तीचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करणे आवश्यक असते या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. व नंतर स्वत : प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले व निवडक उपस्थितांनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. आर. टी. आय, रोहा संस्थेचे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीचे सी. एस. आर प्रमुख सुशिल रुळेकर यांनी केले तर आभार प्रा. तुळशिदास मोकल यांनी मानले. हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी एक्सेल इंडस्ट्रीच्या सुरक्षा विभागाची महत्वपूर्ण मदत झाली. तसेच हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी अखंड मेहनत घेतली.
Comments
Post a Comment