
श्रीवर्धनमध्ये 30 पेक्षा अधिक अवैध धंदे जोमाने सुरू! हफ्ता घेऊन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची होतेय जबरदस्त कमाई हफ्ता घेताना श्रीवर्धन पोलीसांना थोडी पण "लाज" वाटत नाही? अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यावर कारवाई झाली तरच अवैध धंदे बंद होणार! रायगड (निलेश महाडीक) :- श्रीवर्धन येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना अवैध धंद्यांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात 30 पेक्षा अधिक अवैध धंदे असल्यामुळे येथील पोलीसांची कमाई संपूर्ण रायगड जिल्ह्यात जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे. श्रीवर्धनमधील कसबा पेठ येथे साक्षी कलेक्शनच्या समोर व्हिडिओ गेम, मटका, चिमणी पाखरं, साईड जुगार, तसेच श्रीवर्धन बस स्टँड च्या समोर मटका, श्रीवर्धन मार्केटमध्ये मटका अशी 30 ते 35 अवैध धंद्यांची दुकाने चालू आहेत. या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला पोलीसांना लाखो रूपयांचा फफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आह...