श्रीवर्धन येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू
Posts
Showing posts from May, 2023
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना लाखो रूपयांचा हफ्ता? रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून येथे नवीनच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना अवैध धंद्यांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. श्रीवर्धनमधील कसबा पेठ येथे साक्षी कलेक्शनच्या समोर व्हिडिओ गेम, मटका, चिमणी पाखरं, तसेच श्रीवर्धन बस स्टँड च्या समोर मटका, श्रीवर्धन मार्केटमध्ये मटका अशी 30 ते 35 अवैध धंद्यांची दुकाने चालू आहेत. या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला पोलीसांना लाखो रूपयांचा फफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या ब...
- Get link
- X
- Other Apps
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हास्तरिय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संपन्न रोहा (प्रमोद गायकवाड) :- आर.टी.आय. कार्यकर्त्यांची झुंजार संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हास्तरिय कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे संपन्न झाले. याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रघुनाथ कडू यांनी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व आर.टी.आय. कार्यकर्त्यांचे स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांनी सर्व आर.टी.आय. कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री. नूरखान पठाण यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रघुनाथ कडू, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलभाऊ गुजर, भारतीय संविधान अभ्यासक व प्रचार प्रसारक श्री. नूरखान पठाण, रोहा शहर अध्यक्ष श्री. दिपकशेठ तेंडुलकर, रोहा तालुका उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव, दिपक भगत, मनोहर गोरे, परशुराम पायकोळी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील...
- Get link
- X
- Other Apps
माणगांव तालुक्यातील नागरिकांनो सावधान..!! लोन देतो असे सांगून एखादा भामटा तुमची फसवणूक करू शकतो माणगांव (प्रतिनिधी) :- लोन (कर्ज) देतो असे सांगून रायगड जिल्ह्यात फसवणूक करणाऱ्यांनी सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलेला असून भरमसाठ रक्कमेचे कर्ज जलद गतीने देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करण्यास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष करून माणगांव तालुक्यातील नागरिकांनी याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे आणि लोन देतो अशी बतावणी करणाऱ्या कुणालाही आधी पैसे देऊ नये! कारण तुमची फसवणूक होऊ शकते. अनेक बेरोजगारांना, तसेच गरजवंतांना व्यवसायासाठी मोठ्या रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यांपैकी अनेकजण नामांकीत बँकांकडे कर्जाची मागणी करतात. तर काहीजण झटपट कर्ज मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि शॉर्टकट मार्गाने जाऊन स्वतःची फसवणूक करून घेत असतात. अशाच प्रकारे मोठ्या रक्कमेचे कर्ज मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी काही "लुटारू" टपून बसलेले असतात. कर्जाची गरज असलेल्या एखाद्या गरजू माणसाला शोधण्यात हे "लुटारू" चांगलेच पटाईत असतात. ज्यांना कर्जाची गरज आहे अशा माणसांना लुबाडणा...
- Get link
- X
- Other Apps
कोकबन भाजपा कार्यकर्ते भारत खाडे यांची रोहा तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री महेश ठाकुर यांनी घेतली सांत्वनपर भेट. रायगड : सचिन सागळे :- कोकबन गावातील भाजपचे कार्यकर्ते भारत खाडे यांचे वडील श्री जनार्दन धर्मा खाडे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन 3 मे रोजी झाले, शेतकरी कुटुंबामध्ये खूप मेहनत करून आपला दैनंदिन दिनक्रम कोकबन गावात चालू होता. आणी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले भाजपचे कार्यकर्ते श्री. भारत खाडे यांच्या संपूर्ण परिवाराला यातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा रोहा महेशजी ठाकुर यांनी श्री. भारत खाडे यांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी भाजप उपाध्यक्ष- मिथुन सर्लेकर, चणेरा विभाग अध्यक्ष- अतुल पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस- सुहास भगत, उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
सानेगाव येथील खाजगी जागेत झालेली वृक्षतोड ही जमीन मालकाच्या संमतीनेच, तरीही सर्वत्र अफवांचे पीक! कोलाड (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सानेगाव हद्दीतील जमीन मालक सुहास चिमणाजी जोशी, रा. कोथरूड - जि. पुणे यांनी सानेगाव येथील कैलास पांडुरंग जंगम यांना कायदेशीररित्या कार्यकारी दंडाधिकारी रोहा यांच्या समक्ष संमतीपत्र दिलेले असून त्यानुसारच या जागेतील झाडोरा तोडण्यात आलेला असून याप्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रीया कैलास जंगम यांनी दिली. सुहास चिमणाजी जोशी यांच्या मालकीच्या गट नंबर २४४, २६७, ३५४, ३६३, ३७०, ३८०, ३८३, ३९७, ४६५, ४१०, ४२२, ४२५, ४२८, ४२९, ४३८, ४४१, ४४५, ४४७, ४५३ व २७८ अशा जमीन मिळकती आहेत. सदर मिळकतीपैकी गट नंबर ४०५, ४५४, ४४१, ३९७, २६३, ३४० या मिळकतींमध्ये असलेली इंजायली या जातीची झाडे तोडणेकामी त्यांनी रितसर वनरक्षक रोहा यांचेकडे अर्ज केला होता. तसेच उर्वरीत सर्व मिळकतींमधे देखील साफसफाई करुन सपाटीकरण करण्यासाठी सदर सर्व मिळकतींमधील वरील नमूद केलेल्या इंजायली झाडांचे गट नंबर सकट सर्व गटातील असलेला झाडोरा हा सानेगाव येथील श्री. कैलास पांडूरंग जंगम यांनी तोडण्य...