सानेगाव येथील खाजगी जागेत झालेली वृक्षतोड ही जमीन मालकाच्या संमतीनेच, तरीही सर्वत्र अफवांचे पीक!
कोलाड (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सानेगाव हद्दीतील जमीन मालक सुहास चिमणाजी जोशी, रा. कोथरूड - जि. पुणे यांनी सानेगाव येथील कैलास पांडुरंग जंगम यांना कायदेशीररित्या कार्यकारी दंडाधिकारी रोहा यांच्या समक्ष संमतीपत्र दिलेले असून त्यानुसारच या जागेतील झाडोरा तोडण्यात आलेला असून याप्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रीया कैलास जंगम यांनी दिली.
सुहास चिमणाजी जोशी यांच्या मालकीच्या गट नंबर २४४, २६७, ३५४, ३६३, ३७०, ३८०, ३८३, ३९७, ४६५, ४१०, ४२२, ४२५, ४२८, ४२९, ४३८, ४४१, ४४५, ४४७, ४५३ व २७८ अशा जमीन मिळकती आहेत. सदर मिळकतीपैकी गट नंबर ४०५, ४५४, ४४१, ३९७, २६३, ३४० या मिळकतींमध्ये असलेली इंजायली या जातीची झाडे तोडणेकामी त्यांनी रितसर वनरक्षक रोहा यांचेकडे अर्ज केला होता. तसेच उर्वरीत सर्व मिळकतींमधे देखील साफसफाई करुन सपाटीकरण करण्यासाठी सदर सर्व मिळकतींमधील वरील नमूद केलेल्या इंजायली झाडांचे गट नंबर सकट सर्व गटातील असलेला झाडोरा हा सानेगाव येथील श्री. कैलास पांडूरंग जंगम यांनी तोडण्यास व त्याची वाहतूक करण्यास व त्याची विक्री करण्यास कोणतीही हरकत अथवा तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुहास जोशी यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष दिलेले आहे, त्यामुळे सदरचा प्रकार हा जमीन मालकाच्या संमतीनेच कायदेशिररित्या झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
Comments
Post a Comment