कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी कर्जत : पंकेश जाधव :- कर्जत येथील हत्याकांडातील दोन आरोपींना अटक करण्याची धडक कामगिरी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. कर्जत कडून मुरबाडकडे जाणाऱ्या रोडवर कशेळे गावच्या पुढे अबासा फार्म हाउस पासून काही अंतरावर जंगल असलेल्या निर्जळस्थळी रोडच्या बाजूला एक 25 ते 27 वर्षे वयाचा अनोळखी इसमाने दोन्ही हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून गळा कापून निर्घुण खून केल्याच्या अवस्थेत रोडच्या बाजूला पडल्याची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. धुळा टेळे यांनी भेट देवून शहानिशा केली त्यानंतर खबर देणारे इसम नामे श्री. महादेव संभाजी म्हसे यांची प्रथम खबरी फिर्याद घेवून कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.57/2024 भा.दं.वि.क.302 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे श...
Popular posts from this blog
आंबेवाडी येथील गोडया नदीच्या पाण्यात बुडून अनोख्या इसमाचे मृत्यू कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- बुधवार दि.१३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खालून वाहणाऱ्या गोडया नदीच्या पाण्यात बुडून एका अनोख्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली परंतु मृत्यूचे कारण समजु शकले नाही मयत इसमाची ओळख पटली नसुन सदर कोलाड पोलिस ठाण्यात अ.मृ. रजि. नं. व ४/२०२४ सिआरपीसी कलम १७४ नुसार आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. असुन अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोसई चौधरी, पो.हवालदार गायकवाड करीत आहेत
तळा येथील टोकार्डे गावानजीक एसटी आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू तळा (नजीर पठाण) : - तळा शहरानजीक असलेल्या टोकार्डे गावाजवळ एसटी बस आणि एका दुचाकीची समोररामोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मदन बाळकृष्ण देवघरकर वय, ४८, रा. जाधववाडी, ता. रोहा असे मृताचे नाव असून तो बांधकाम व्यावसायिक होता. त्याच्या मागे त्याची पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.. मदन बाळकृष्ण देवघरकर हे सकाळी भाजीपाला आणण्यासाठी तळा येथे गेले होते पुन्हा घराकडे जात असताना वाटेतच टोकार्डे गावाजवळ त्यांचा अपघात होऊन त्यांचा निधन झाले. सदरची घटनेची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment