श्रीवर्धन येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू 

पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना लाखो रूपयांचा हफ्ता?

रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून येथे नवीनच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना अवैध धंद्यांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.

श्रीवर्धनमधील कसबा पेठ येथे साक्षी कलेक्शनच्या समोर व्हिडिओ गेम, मटका, चिमणी पाखरं, तसेच श्रीवर्धन बस स्टँड च्या समोर मटका, श्रीवर्धन मार्केटमध्ये मटका अशी 30 ते 35 अवैध धंद्यांची दुकाने चालू आहेत. या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला पोलीसांना लाखो रूपयांचा फफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेष म्हणजे श्रीवर्धन परिसरात 30 पेक्षा अधिक अवैध धंदे सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत.

महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. कारण पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्यावर कारवाई झाली तरच येथी अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog