सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सातारा : प्रतिनिधी :- सैनिकांच्या बलीदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहेत. सैनिकांबाबत संवेदनशिल आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते. माजी सैनिकांच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, लोकसंख्येच्या आधारवर जमिनी खूप कमी आहेत. ज्या जमिनी माजी सैनिकांनी पसंत केल्या आहेत त्या शासकीय जागा विविध प्रकल्पांना देण्यात आलेल्या आहेत. अनेक काळापासून प्रलंबित असणारा सैनिकांच्या ...
Popular posts from this blog
सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पुणे : प्रतिनिधी :- मातृभूमीची सेवा बजावतांना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. पुणे जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देवून त्यां...
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त पुणे : प्रतिनिधी : - पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत आंबेगाव तालुक्यात मंचर गावचे हद्दीत चाकण रोडवरील पेट्रोल पंपासमोर चविष्ठ ढाब्याजवळ, भोरवाडी येथे वाहनाची तपासणी केली असता वाहनातून परराज्यनिर्मीत असलेला भांग मिश्रीत पदार्थाच्या वाहनासह एकूण ९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे. याप्रकरणी प्रविण मगाराम चौधरी, देहुफाटा, चाकण ता. खेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ अन्वये १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिर्मीत स्पेशल बावा विजयावटी भांग मिश्रीत पदार्थाने तयार केलेल्या गोळयांच्या पाकीटांनी भरलेल्या सुमारे ५० किलो ग्रॅमच्या एकूण ५ गोण्या अंदाजे २५० किलो ग्रॅम वजानाचे भांग मिश्रीत पदार्थ, एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंप...
Comments
Post a Comment