माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हास्तरिय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संपन्न 

रोहा (प्रमोद गायकवाड) :- आर.टी.आय. कार्यकर्त्यांची झुंजार संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हास्तरिय कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे संपन्न झाले. 

याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रघुनाथ कडू यांनी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व आर.टी.आय. कार्यकर्त्यांचे स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांनी सर्व आर.टी.आय. कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री. नूरखान पठाण यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रघुनाथ कडू, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलभाऊ गुजर, भारतीय संविधान अभ्यासक व प्रचार प्रसारक श्री. नूरखान पठाण, रोहा शहर अध्यक्ष श्री. दिपकशेठ तेंडुलकर, रोहा तालुका उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव जाधव, दिपक भगत, मनोहर गोरे, परशुराम पायकोळी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog