
मांडवा सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेकायदा जुगार क्लब बंद कधी होणार? येथील बेकायदा जुगर क्लबवर पोलीसांचा वरदहस्त! रायगड (निलेश महाडीक) :- अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा जुगार क्लब बंद कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिलेला असून पोलीसांच्या आशिर्वादामुळे हा बेकायदा जुगार क्लब सुरू असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. चोंढी येथील बायपास रोडजवळ बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विशेष म्हणजे येथील प्रभारी पोलीस अधिकारी राजीव पाटील यांच्या कार्यक्षेत्रात हा अवैध धंदा सुरू असताना देखील या अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे! या अवैध जुगार क्लबमुळे या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून या अवैध धंद्याला परवानगी दिली तरी कुणी? असा सवाल या परिसरातील सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी हा अवैध जुगार क्लब तातडीने ब...