म्हसळा येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू 

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांना लाखो रूपयांचा हफ्ता?

रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांना अवैध धंद्यांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे.

म्हसळा येथील कुंभारवाडा येथे बेकायदा मटका जुगार आणि व्हिडीयो गेम, बाजारपेठ येथे मटका जुगार एसटी स्टँड येथे मटका जुगार, दिघी रोड येथे मटका जुगार असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून बारटक्के, छेडा आणि विचारे या तिंघांनी हे अवैध धंदे सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. या अवैध धंद्यांकडून दर महिन्याला म्हसळा पोलीसांना लाखो रूपयांचा फफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत.

महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. कारण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांच्यावर कारवाई झाली तरच येथी अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog