म्हसळा येथे बेकायदा मटका जुगाराचा धंदा तेजीत!
पोलीसांनी मटका माफीयांवर गुन्हा दाखल करावा : नागरिकांची मागणी
रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे अवैध मटका जुगाराचे धंदे तेजीत सुरू असल्याचे दिसत असून येथील बारटक्के आणि विचारे या दोन मटका माफीयांविरूद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
म्हसळा येथे मटका जुगार राजरोसपणे सुरू असून बारटक्के आणि विचारे या दोन मटका माफीयांनी हा अवैध धंदा सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment