म्हसळा येथील प्रभारी पोलीस अधिकारी संदीपान सोनावणे यांना मटका माफीयांकडून लाखो रूपयांचा हफ्ता? 

म्हसळा पोलीसांना लागलीय भीक, म्हणून हफ्ता घेऊन करतात उदरनिर्वाह? 

रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे बारटक्क्या नावाच्या माणसाचा बेकायद्दा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांनी हफ्ता घेऊन या मटका जुगाराला संरक्षण दिल्याचे बोलले जात आहे. येथील पोलीस अवैध धंद्यांकडून हफ्ता घेण्याचे बंद करीत नसल्यामुळे येथील पोलीसांना भीक लागली आहे का? डीपार्टमेंट कडून मिळणारा पगार कमी पडतो का? अशी संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

येथील पोलीसांच्या "हफ्तेखोरी"मुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. पण तरीही येथील पोलीस गप्प का? कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog