चोंढी बायपास रोड येथे खेळ मांडला जुगाराचा!

बेकायदा जुगार क्लबमुळे कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर

रायगड (निलेश महाडीक) :- अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील बायपास रोडजवळ बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे.

या अवैध जुगार क्लबमुळे या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून या अवैध धंद्याला परवानगी दिली तरी कुणी? असा सवाल या परिसरातील सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. 

सध्या चोंढी येथे सुरू असलेल्या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. सदरचा बेकायदा धंदा या परिसरात राजरोसपणे सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.

Comments

Popular posts from this blog