“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत रोजगार मेळावे कार्यक्रम संपन्न

रायगड : आशिष शेळके :- “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन  केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत  दि. 27 मे 2023 रोजी श्री समर्थ मंगल कार्यालय, खोपोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात एकूण 35 उद्योजकांनी सहभाग नोंदवून 1 हजार 505 रिक्तपदे अधिसूचित केली होती. या रोजगार मेळाव्यास एकूण 552 बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला होता. तिथे उपस्थित विविध नामांकित कंपनीच्या उपस्थित प्रतिनिधीकडे 839 उमेदवारानी मुलाखती दिल्या होत्या. त्यामध्ये 244 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली होती.

      तसेच दि. 08 जून 2023 रोजी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन  केंद्र व जन शिक्षण संस्था रायगड यांच्यावतीने “शासन आपल्या दारी” व G20 जन भागीदरी  या उपक्रमांतर्गत रोहा येथील स्वामी विवेकानंद ट्र्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये मार्गदर्शन सत्र घेण्यात आले होते. या सत्रास 70 महिला व इतर उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली होती. स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ मर्या.कर्ज योजना व  कौशल्य विकासातून रोजगार व स्वंयरोजगार व स्टार्टअप या विषयीची माहिती देण्यात आली.

      त्यानंतर दि.15 जून 2023 रोजी ऑनलाईन व शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह ता.पनवेल येथे पंडीत दिनदयाळ  महारोजगार मेळावा ऑफलाईन आयोजित केला आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog