महाड शहरामध्ये बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू!
पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांचे दुर्लक्ष
पाटील, शिंदे, पवार आणि चव्हाण या चौघांचे अवैध धंदे तेजीत
रायगड (निलेश महाडीक) :- महाड शहरामध्ये मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील बेकायदा मटका-जुगार जोमाने सुरू असल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
महाड शहरामध्ये सुकट गल्ली, शिवाजी चौक, बाजारपेठ येथे बेकायदा मटका जुगार राजरोसपणे सुरू असून येथे पाटील, शिंदे, पवार आणि चव्हाण या चौघांनी हे बेकायदा धंदे सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. येथील अवैध मटका जुगाराचे धंदे पाहता महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांनी अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याने या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे स्पष्ट होत चालले आहे. महाड शहरातील पोलीस सुधरणार कधी? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे.
येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा मटका जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात असून मटका माफीयांकडून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळेच पोलीस या अवैध धंद्यांना साथ देत असल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
Comments
Post a Comment