दि. 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 अलिबाग : प्रतिनिधी :- मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत  दि.21 जुलै 2023 ते दि.21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे.

     यामध्ये  नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नाव, वय, पत्ता इ. दुरुस्ती करणे, मयत स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणी करणे, मतदारयादीतील वय वर्षे 80 वरील मतदारांची पडताळणी करणे, मतदारयादीतील अस्पष्ट फोटोबाबत कार्यवाही करणे, युवा मतदारांची विशेषत: दि.1 ऑक्टोबर, 2023 व दि.1 जानेवारी 2024 या महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे, महिला, अपंग, तृतीयपंथी यांच्या मतदार नोंदणीमध्ये वाढ होण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्यासाठी अधिकाधिक जनजागृती देखील करण्यात येणार आहे.

     तसेच वोटर हेल्पलाईन ॲप/वोटर सर्व्हिस पोर्टल (Voter Helpline App/Voter Service Portal) या वेबसाईट वरुन मतदार नाव नोंदणी दुरुस्तीसाठी अर्ज करु शकतात. दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुनरिक्षण-पूर्व उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     अधिक माहितीसाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. या मोहिमेदरम्यान रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी केले आहे.


00000

Comments

Popular posts from this blog